जम्मू-काश्मीरमधील वृत्तपत्रांनी पहिले पान काळे छापत नोंदवला निषेध   

श्रीनगर : पहलगामवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी जम्मू- काश्मीरमधील विविध प्रमुख वृत्तपत्रांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी त्यांचे पहिले पान काळ्या रंगात प्रकाशित केले. या अमानवी कृत्याबद्दल जम्मू-काश्मीरमधील माध्यमांनी त्यांच्या एकजुटीचे आणि वेदनेचे दर्शन घडविले. ग्रेटर काश्मीर, रायझिंग काश्मीर, काश्मीर उझमा, आफताब आणि तैमील इरशाद यासारख्या प्रमुख्य इंग्रजी आणि ऊर्दू दैनिकांनी त्यांचे पहिले पान काळ्या रंगात प्रकाशित केले. हल्ल्याच्या वृत्ताचे शीर्षक लाल रंगात छापले आहे. 
 
अतिशय क्रूर : काश्मीर निराश, काश्मीर दु:खी अशा आशयाचे मथळे दैनिकांनी दिले आहेत. 'हरित कुरणावर हत्याकांड', काश्मीरच्या आत्म्याचे रक्षण करा' अशा आशयाचे संपादकीय विशेष लेख प्रकाशित करत हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. 

Related Articles